Monday 18 April 2016

" हवेवरचा गहू "






" हवेवरचा गहू "
या गव्हाला World Trade Organisation कडून जी आय (भौगोलिक निर्देशन) ट्याग मिळण्यासाठी
रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्या साठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. साडेचार - पाच महिन्यात उत्पन्न येते. एकरी २० किलो बियाणे लागते त्यात एरवी ५ ते ६ क्विंटल (कधी कधी ६ ते ७ पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मिळ असल्या मुळे सध्या परंपरागत काही लोकांच्या कडेच उपलब्ध आहे. खानापूर घात माथ्यावर ८ ते १० गावांत मिळून किमान १२५ ते १५० एकरात हा गहू काढला जातो. आमच्याकडे त्यास " हवेवरचा गहू " असे म्हणतात. इतर सर्व गव्हांच्या वाणा पेक्षा हा वेगळा असतो . त्याचा बाजार भाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत जास्तीचा असतो. या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्या अत्यंत मऊ , स्वादिष्ट आणि पचायला हलक्या तसेच आरोग्यास चांगल्या असतात असे लोकांचे म्हणणे आहे

No comments:

Post a Comment