Monday, 10 November 2025

अग्रणी नदी पुनरुज्जीवन कामांचे ऑडिट करण्याची मागणी


 *अग्रणी नदी वाहते, उगम मात्र कोरडाच!*

*अग्रणी नदी पुनरुज्जीवन कामांचे ऑडिट करण्याची मागणी* : अग्रणी नदीपात्राची झाली मोठी हानी


अग्रणी नदी वाहती मात्र उगम मात्र कोरडाच !*

*नदी पुनरूज्जीवन कामांचे ऑडिट करण्याची मागणी*

विटा : विजय लाळे

खानापूर घाटमाथ्यावरची अग्रणी नदी पुनरू ज्जीवन कामासाठी २०१३ साली पाहणी केली. त्यावेळी अग्रणीच्या उगमापासून काम होणे गरजेचे, असे आपल्याला सांगितले होते. परंतु, त्याठिकाणी अपेक्षित काम झाले नाही. आज अग्रणी नदी वाहती झाली असली, तरी तिचा उगम मात्र कोरडाच राहिला या शब्दांत आपली खंत प्रख्यात, आंतरराष्ट्रीय जलतज्ञ आणि जल बिरादरीचे संस्थापक डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी एप्रिल २०२४ मध्ये म्हणजे साधारण पणे ११ वर्षानंतर बोलून दाखवली. 

 अग्रणी, कृष्णा नदीची एक महत्त्वाची उपनदी. जी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून वाहते. या नदीचा उगम सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तामखडी गावाजवळ अडसर वाडी गावाच्या हद्दीत होतो. पुढे सांगली जिल्ह्यातून ६० कि.मी. प्रवास करून ४५ किमी अंतर पार करून कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात हुळगबल्ली गावाजवळ कृष्णेला  मिळते. अग्रणी नदीचे खोरे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी असे एकूण ५ तालुक्यांमध्ये सामावले आहे. तर सांगली जिल्ह्यातील १०७ गावे या खोऱ्यात आहेत. या नदीच्या खोऱ्यात एकूण ७ पाणलोट क्षेत्रे आहेत. यांत महांकाली नदी नावाची २२.५ कि. मी. लांबीच्या उपनदीचा समावेश आहे. मात्र या नदीचे अस्तित्व खानापूर तालुक्यात गाळ,माती आणि झाडाझुडपांमुळे लुप्त झाले होते. २०१२ च्या अखेरीस तालुक्यातील बळीराजा धरणाचे प्रणेते कॉम्रेड संपतराव पवार हे पुण्यात जलबि रादरीच्या कार्यक्रमाला गेले असता त्यांनी डॉ राजेंद्रसिंहांना अग्रणी नदीच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली आणि त्यांना या नदीची पाहणी करण्यासाठी बोलावले. त्यानंतर जलबिरादरी,

महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना

 आणि लोकसहभागातून २०१३ मध्ये अग्रणी पुनरुज्जीवन काम सुरू झाले. तब्बल दोन वर्षा च्या कामानंतर अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित झाली. मात्र पुनरुज्जीवनाची कामे अपूर्ण अस तानाच डॉ. राजेंद्र सिंहांसह जलबिरादरीच्या लोकांनी, राज्य शासनाच्या काही संबंधित अधि काऱ्यांनी आणि जिल्ह्यातील काही अतिउत्सा ही मंडळींनी जणू अग्रणी नदी ही अस्तित्वातच नव्हती आणि ती आता नव्यानेच निर्माण केली अशा थाटात पुनरुज्जीवनाची जाहिरातबाजी केली, ठराविक ठिकाणचे व्हिडिओ आणि फोटो काढून टिचभर कामाची हातभर प्रसिद्धी केली. त्यामुळे नदी पहिल्यांदा ज्यावर्षी प्रवा हित झाली त्याच वर्षी म्हणजे २०१५ मध्ये डॉ.

राजेंद्रसिंह राणा यांना स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळाला, ज्याला "पाण्यासाठीचा नोबेल पुर स्कार" असेही म्हणतात. विशेष म्हणजे हा  पुर स्कार त्यांना पाणी संवर्धनातील त्यांच्या कार्या साठी देण्यात आला. पुढे २०२० साली या पुन रुज्जीवनाच्या कामाला राष्ट्रीय जल पुरस्कार ही मिळाला. 

मात्र हे चित्र असतानाच दुसरीकडे टेंभू उपसा योजनेचे पाणी बलवडी (खा) गावाजवळील लेंडूर ओढ्यामार्गे अग्रणी कडे वळविल्याने तेथून पुढे पात्र प्रवाही होते. तसेच गेल्या दोन- तीन वर्षात जाधववाडी, गोरेवाडी या गावांच्या दिशेने ही टेंभूचेच पाणी वळविल्याने नदी पट्ट्याला पाणी मिळते. उगमाकडच्या अडसर वाडी- पोसेवाडी, तामखडी, ऐनवाडी वगैरे

गावांना पाणी मिळत नाही. तर बलवडी बेणा पूर, सुलतान गादे आणि पुढे तासगाव तालुक्या तील सिद्धेवाडी तलावापर्यंत अग्रणी नदी पात्रा च्या दोन्ही बाजूंना गाळ आणि माती रचून ठेवल्याने केवळ कालव्याच्या स्वरूपात वाहत आहे. खानापूर तालुक्यातील संपूर्ण नदी पट्ट्यात खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी नदीकडे पावसाच्या पाण्याचे येणारे नैसर्गिक प्रवाह अडवले गेलेले आहेत. अनेक ठिकाणी भरतीचे ओतही नष्ट केलेले आहेत. नदीपात्रातील गाव काढण्याच्या नावाखाली चांगली वाळू अक्षरशः खरवडून काढली गेली आहे. तसेच जिथे खडक आहेत ती ठिकाणे तशीच ठेवली आहेत. परिणामी काही ठिकाणी (उदाहरणार्थ करंजे गावाजवळ)  मूळचा आकारच बदलला आणि नदीपात्रही वळवले गेले आहे. त्यामुळे एखादा मोठा पाऊस पडला तर एकाच वेळी तीन तीन नद्या वाहताहेत असे दिसते. त्यातून नदीकाठाच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

आता फक्त तीन बातम्यांचा इथे उल्लेख करतो.

१) करंजेत जलयुक्त शिवारातून बदलले नदीचे पात्र (दि.४ ऑक्टोबर २०१५, रोजीची दै. पुढारी ची बातमी) सुलतान गादे ते करंजे या दरम्यानचे अग्रणी नदी पात्राचीच अक्षरश : वाट  लागली आहे. इथे नदीच्या पूर्वेकडच्या काठावर असलेल्या विठोबा मदने यांच्या शेतात चक्क बुल्डोजर फिरवून पूर्वी १२० अंशाचे असणारे पात्र ९० अंशाने वळवण्यात आले आहे. त्यामुळे श्री मदने यांची तब्बल दीड एकर शेती पात्रात गेली.  तर दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडचे पात्र आकसले आहे. दुसरीकडे करंजे ते रामनगर ( जुनी मुलानवाडी ) या रस्त्यालगत नदी पात्रात खासगी विहिरी पाडून अतिक्रमणे करून दिली आहेत.

२) अग्रणीतील ३० बांध वाहून गेले ; वाळू उपशाचा फटका, नदीकाठच्या १५ विहिरी मुजल्या. (२५ सप्टेंबर २०१५,रोजीची दै. पुढारी मधील बातमी) गेल्या आठवड्यात एका दिव सात ६४ मिलीमीटर झालेल्या पावसामुळे ३० हून अधिक माती बांध फुटले, शिवाय वाळू नसलेला गाळ जो कडेला रचून ठेवला होता, तो परत पात्रात ढासळला, नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करताना उपसलेला गाळ दोन्ही बाजूंच्या काठांवर रचला, परिणामी दोन्ही काठांच्या शेत जमिनीत प्रचंड अतिरिक्त पाणी साचून जमिनी खचल्या. कारण दोन्ही काठांवर गाळ रचल्यामुळे अतिरिक्त पाणी नदी त जाण्यासाठी ओत किंवा पानंद सारख्या नैसर्गिक व्यवस्थाच बंद झाल्या आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मूळ नदीत पाणी  शिल्लक राहिले नाही.

३)अथणी तालुक्यातील कृष्णा काठ परिसरात महापूर स्थिती असताना दुसरीकडे अग्रणी नदीचे पात्र मात्र कोरडे पडले (१७ जुलै २०२२, दै. पुढारी तील संबरगी गाव च्या प्रतिनिधीने दिलेली बातमी) एकाच तालुक्यात परस्पर विरोधी स्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे पाण्यामुळे पिकांना धोका तर दुसरीकडे पाण्याशिवाय पिके कशी जगणार, याची चिंता आहे. दोन्ही भागातील गावांना समस्येचा सामना करावा लागत आहे.अथणी उत्तर भागात ६० किलोमीटर अंतरावर अग्रणी नदी आहे. दरवर्षी पश्‍चिमेकडे महापूर असता ना ही नदी कोरडीच असते.गेली सहा महिने नदी कधी प्रवाहित झाली नाही. कारण परिसरा त पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. ऐन पावसा ळ्यात शेतकर्‍यांवर पाणी म्हणण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे एकूणच अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्य क्रमाचा नेमका काय आणि कोणाला लाभ झाला ? याबाबत जसे संशयास्पद किंवा निकृष्ट बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होते तसे या  पुनरुज्जीवन कामांचे ऑडिट व्हायला पाहिजे. पण प्रश्न एवढाच आहे की करणार कोण ? 











No comments:

Post a Comment